कोणाला कधी, कुठे आणि कसे प्रेम होईल सांगता येत नाही! हे प्रेम मिळवण्यासाठी व्यक्ती कोणत्याही थराला जाऊ शकते. असाच काहीसा टोकाचा निर्णय घेतला आहे इंग्लंडमधील हेदी हेपवर्थ या 44 वर्षीय महिलेने. हेदी हेपवर्थ ही विवाहित असून तिला 9 मुले आहेत. मात्र, आता फेसबुकवर फ्रेंड असलेल्या आपल्या प्रियकरासाठी ती आपला 23 वर्षांचा संसार मोडणार आहे. एवढेच नव्हे तर आपल्या 9 मुलांनाही सोडून जाणार आहे. इंग्लंड येथील ईस्ट बोल्डन येथे राहणाऱ्या हेदीने फेसबुकच्या माध्यमातून ओळख झालेल्या 30 वर्षीय ममादूबरोबर संसार थाटण्याची तयारी केली आहे. पश्चिम आफ्रिकेतील गांबिया देशात राहणाऱ्या ममादूला हेदी नुकतीच भेटली होती. त्यानंतर तिने हा निर्णय घेतल्याचे कळते असे वृत्त इंग्लंडमधील इव्हिनिंग स्टॅण्डर्ड्स या वेबसाईटने दिले आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews